Wednesday, November 11, 2009

notes...

रात्री आपण बोललो आणि मग चहा घेऊन झाल्यावर एक थोडा वेळ सुनिता बाईंचे "आहे मनोहर तरी ..."  वाचून मग निघू असा विचार करून मी वाचायला बसले. आणि काय माहित का, पण वाचता वाचता असं वाटायला लागलं की आपल्याला कळलेले पु. लं आणि त्यांनी पाहिलेले भाई हे इतके वेगळे होते. एखाद्या माणसाबरोबर २४ तास राहिल्याशिवाय खरा माणूस आपल्याला कळतच नाही ना रे! म्हणजे काही तो माणूस चांगला किंवा वाईट हे ठरवण्याबद्दल नाही म्हणत आहे मी. वाईट judgement नाही करता येणार त्या माणसाबद्दल कारण आपल्यासाठी तो तसाच सही असतो, पण जवळच्या व्यक्तीसाठी दुसराच कुणीतरी. मधूनच असं वाटून गेलं की आयुष्यभराचा साथीदार या पेक्षा थोडं वेगळ नातं होतं त्यांचं. मित्र तर होतेच पण कुठेतरी त्यांचंच मूल ही असल्यासारखं वाटलं. इतक्या सगळ्या माणसांच्यात त्या वावरल्या, पण तरीही कुठेतरी एक एकटेपणा राहिला तो तसाच. आपल्याला बाहेरून असं नक्कीच वाटू शकेल की पु. लं. यांची बायको म्हणून, त्यांच्या सतत बरोबर राहिल्यामुळे किती भाग्यवान होत्या त्या... काय खास आयुष्य! पण प्रत्येकालाच असं दुसऱ्याबद्दल वाटत असणारच. 


असो ... आता झोपायला गेलं पाहिजे. पण थोडसं अस्वस्थ वाटतंय रे ... की इतक्या खंबीर असलेल्या स्त्रीला सुद्धा कुठेतरी इतका एकटेपणा टोचतो, तर साधारण मुलींचं काय? आणि राहून राहून एक खंत तर आहेच की त्यांची क्षमता काही कमी नव्हती पण त्यांनी स्वेच्छेने म्हणा किंवा परिस्थितीमुळे, स्वतःचं आयुष्य थोडं बाजूलाच ठेवलं. आपल्या इतक्या थोर नवऱ्याच्या क्षमतेला आणि कारकिर्दीला ठेच पोहोचू नये म्हणून ही असेल कदाचित. त्यात त्यांचा मोठेपणा होता असं नाही म्हणत मी. बराचसा आनंदच असेल. आपल्याच कुणाचे चांगले गूण, भाग्य, यश याबद्दल  स्वतःला होणाऱ्या आनंदाला एक किंचीतशी स्वार्थाची झलार ही असतेच. ते कदाचित ओघानेच आलं ही असेल. पण त्यांच्याकडून जगाला अजून काही मिळायचं राहून गेलं की काय असा एक आपला प्रश्न मनात येऊन गेला ...
मी हे प्रश्न विचारून काहीही फरक पडणार नाहीये तरीही पडलेले प्रश्न ते आहेतच ... सध्या इथेच थांबते ... 


--- मुक्ता

9 comments:

heliophile said...

ah ! suddenly into fiction? and that too marathi? chaangala lihila aahes..
onkar

M said...

thank you onkar. blog var transliteration option sapadlya pasun manaat hota. pan arey fiction kuthla... tyancha pustak kahi goshta nahiye :)

vishal said...

@Mukta's comment :
:D ...
Blog farach chhan ahe..manat umatalele tarang ani tyancha interference.. ! Waaa...
Ek chhotti goshta suchwawishi watli..
"आपल्याच कुणाचे चांगले गूण, भाग्य, यश याबद्दल स्वतःला होणाऱ्या आनंदाला एक किंचीतशी स्वार्थाची झलक ही असतेच." ya wakyat "zalak" chya aaiwaji "zaalar" shabda changla watel ka?

pushkaraj said...

M! marathi madhya tu kahi lihilela pahun ati ananda hot ahe. Tuzhya manatle vichaar manatun blog var agdhi uchlun thevlya sarkhe ahet. Tu he saadhya kelas hi goshta mala aavadli!! Ankhi asech blogs chi vaat pahat ahot..

Joshi said...

hmm...Sunita baaini khup lihayala have hote. swataha khup nahi pan kahi pustake sampadit keli ahet. ani kahi vyaktivar swataha lihile ahe. tyancha ani G.A.Kulkarni yancha patra-samwad pan publish zala ahe. sagalech vachale pahije.

maneesh said...

Nobody sees the man behind the mask; nobody wants to.

And it's easy to overlook the fact when a man offers up easily digestible bits of well-rounded text that all but scream, "I think like this, ergo I must be this..." The happy man's the good joker and the sad writer must be the monster.

It's probably a mark of the talent that one doesn't see the mask but, I think, one would be guilty of a disservice to the same talent if one didn't try to peel it away and peek behind.

Of course, it is probably saddest when the man in question forgets the divide himself...

maneesh said...

And may I add, whaddya think?!

Sudi said...

Excuse me... Can you please give the gist in English ??? I am sorry, my Marathi is pretty bad, cannot understand anything, basically.. ;) ;)

maneesh said...

That came out kinda angry...

Would it be too sentimental to say that our belief in our idols is in some way a transferance of our faith in humanity itself, an aggregate of the just and the best in all of us? And to be let down cuts a lot deeper than it should?